आमदार निलेश लंके यांच्याबद्दल नामादार बाळासाहेब थोरात म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंज प्रश्नांवर बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक करत सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमदार निलेश लंके हा जनतेतील माणूस आहे. कामाचा माणूस आहे.

मेहनतीच्या जिवावर ते आमदार झाले आहेत. के. के. रेंजसाठी जमीनीचे हस्तांतर झाले तर निलेश लंके रणगाड्यासमोर पहिला झोपेल. निलेश लंके यांचे काम तरूण वर्गासाठी क्रांतीकारी तसेच प्रेरणादायी असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.

यावेळी नगरविकास, उर्जा, आदीवासी तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके यांचे प्रतिनिधी वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, कामगार नेते दत्ता कोरडे,

राजू रोडे यांच्यासह थोरात यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. यावेळी मंत्री तनपुरे, अ‍ॅड. राहुल झावरे यांनी थोरात यांच्याकडे जमीन हस्तांतर प्रकरणी सुरू असलेल्या हालचालींची माहीती दिली.

या भागात मोठया प्रमाणात धनगर समाज तसेच आदीवासी आहेत. लष्कराकडून राज्य शासनाने जमीन हस्तांतरीत करून घेतली असेल तर त्या बदल्यात लष्करास जमीन हस्तांतरीत करणे बंधनकारक असते.

परंतू त्यासाठी नगर जिल्ह्यातीलच जमीन देणे बंधनकारक नाही असे मंत्री थोरात यांनी सांगितले. फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल.

निर्णय काहीही असो या भागातील आदीवासी तसेच शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही या भुमीकेवर आपण ठाम आहोत. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणणे हेच पाप आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ३०० लोकांवरही गुन्हे दाखल करा,

अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केली आहे. यावरून खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यात आरोपप्रत्यारोप झाले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment