पारनेर तालुक्यातील नेत्यांवर गुन्हे दाखल करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील विविध पक्षांचे नेते २०० ते ५०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय सभा घेत असून यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमाबंदी आदेशाचे व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केले जात आहे.

त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणे व कोव्हिड सारख्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी आग्रही मागणी पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली

आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष वसीम राजे, तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के, अविनाश पवार यांनी ही मागणी केली असून पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या वेळी पारनेर पोलीस मनसे कार्यकर्त्यांवर दबावतंत्राचा वापर करत आहेत,

पण इतर राजकीय पक्षांना मोकळीक देतात या गोष्टींचा मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांवर दूध दरवाढ आंदोलनाच्या वेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशीही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनसेचे पदाधिकारी यांनी यावेळी इतर पक्षांच्या कार्यक्रमाबाबत आक्षेप नोंदवला असून या कार्यक्रमांमध्ये सामाजिक अंतर, मास्कचा वापर इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर होत नाही, तसेच कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तहसिलदार,

पोलीस प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असताना तालुक्यातील विविध पक्षांचे नेते कायद्याचे उल्लंघन करून कोरोना फैलावाला आमंत्रण देत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम घेऊन जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या

या विविध राजकीच पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment