पावसाची विश्रांती `या` धरणाचे विसर्ग घटले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाची रिपरिप थांबली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. यामुळे दारणा, गंगापूर, गोदावरीतील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात येणारा विसर्ग घटविला आहे.

धरण परिसरात पावसाने उघडीप दिल्याने धरणांचे विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणा 1650, गंगापूर 520 तर गोदावरीतील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात येणारा विसर्ग 4842 क्युसेकवर आणण्यात आला आहे. जायकवाडीत काल सायंकाळी 6 वाजता 10382 क्युसेकने नविन पाण्याची आवक सुरू होती.

जायकवाडी 82.60 टक्क्यांवर पोहचले आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात दारणात 624 दलघफू नविन दाखल झाले होते. भावली, भाम मधुन त्यात पाणी दाखल होणे सुरू होते. परंतु पावसाने विश्रांती घेतल्याने आवक मंदावली आहे. परिणामी दारणातून सोडण्यात येणारा विसर्ग घटविला आहे.

मंगळवारी 8490 क्युसेकने सुरू होता तो काल सकाळी 6 वाजता 1650 क्युसेक इतका घटविण्यात आला. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 6675 दलघफू पाणीसाठा होता. हे धरण 93.37 टक्के इतके भरलेले आहे. गंगापूरच्या पाणलोटातही पाऊस थांबला आहे.

5630 क्षमतेच्या या धरणात 5304 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण 94.21 टक्के भरले आहे. मंगळवारी 1040 क्युसेकने विसर्ग सुरू होता. मात्र पाऊस थांबल्याने विसर्ग निम्म्यावर आणण्यात आला आहे. काल सकाळी 6 वाजता 520 क्युसेक इतका करण्यात आला.

खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात नविन दाखल होणारे पाणी घटल्याने या बंधार्‍यातून गोदावरीतील विसर्ग 12766 वरुन 4842 क्युसेक इतका कमी करण्यात आला आहे. काल सकाळी 6 पर्यंत एक जून पासून गोदावरीत या बंधार्‍यातून 17.9 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

जायकवाडीत नविन पाणी कमी झाले आहे. काल सायंकाळी 6 वाजता 10382 क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडीत 82.60 टक्के पाणीसाठा झाला होता. उपयुक्तसाठा 63.3 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 89.4 टीएमसी इतका झाला आहे. 11 ते 12 टीएमसी पाणी दाखल झाल्यानंतर हे धरण 100 टक्के होणार आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment