Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर वाळुची गाडी घालण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर टाकळी ढोकेश्वर मध्ये वाळुची हायवा गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील त्रिमूर्तीं पेट्रोल पंपसमोर गुरूवारी रात्री ८.४५ वाजता ही घटना घडली असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी या वाळुने भरलेला हायवाचा ५ किलोमीटर पाठलाग केला असता

तो पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान या हायवा ट्रकचा क्रमांकही महसूल व पोलिस प्रशासनाला प्राप्त झाला आहे.दरम्यान सपोनि प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा सह जीवे मारण्याचा प्रयत्न व वाळुचोरीच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button