अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गुरुवारी नागरिकांनी आवश्यक भाजीपाला,

किराणा व इतर सामान खरेदी करावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. २८ ते ३१ ऑगस्ट असे चार दिवस लॉकडाऊन असेल.

या काळात वैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दूध, बँक व पतसंस्था सकाळी ५ ते ८ या वेळेत सुरू राहतील. शहरात गेल्या तीन दिवसांत १०० हून अधिक रुग्णांची भर पडली. गांधीनगर, महादेवनगर, गोरोबानगर, दत्तनगर, टिळकनगर,

विवेकानंदनगर, सप्तर्षीमळा (कालेमळा) सुभाषनगर, संजयनगर, समतानगर व निवारा सुभद्रानगर या भागात हे रुग्ण आढळून आले. या भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ज्या घरात तीनपेक्षा जास्त व्यक्ती बाधित आढळतील, त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाने हा लॉकडाऊन जाहीर केला.

सर्व भागातील छोटे-मोठे व्यवसाय बंद राहतील. रस्त्यांवर ये-जा बंद करण्यात येईल. मुख्य चौकात पोलिसांचा बंदोबस्त असेल.

प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन स्थानिक प्रशासन अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शहर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment