नवीन दुचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता दिनांक 7 सप्टेंबर, 2020 रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे.

इच्छुक अर्जदारांनी दिनांक 27 ऑगस्ट, 2020 ते 03 सप्टेंबर, 2020 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत दरवाजावर डिमांड ड्राफ्ट जमा करण्याकरीता इमारतीच्या प्रवेशव्दारावर कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तेथे जमा करावेत.

वाहन ज्याच्या नाववर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (फोटो आयडी- भ्रमणध्वनीक्रमांक व ईमेल सह) जोडावा. पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट Dy.RTO,Ahmednagar या नावाने काढावा. डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असावा.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी दिनांक 3 सप्टेंबर, 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत प्रवेशव्दारवर प्रदर्शित करण्यात येईल. यादीत असलेल्या पसंतीक्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे.

अशाच अर्जदारांनी दिनांक 4 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठीच्या पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करुन प्रवेशव्दारावरील कक्षात जमा करावा.

एकाच पसंतीक्रमांसाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन बंद सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट दिनांक 4 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 4.30 वाजता कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर उपस्थित रहावे. कार्यालयात सादर झालेल्या जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारांसमोर उघडण्यात येतील.

ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधीत अर्जदारांना परत देण्यात येईल.

तसेच विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे दिपक पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर यांनी कळविले आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!