कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक बदलांनी सोन्याच्या किंमतींना आधार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  साथीच्या प्रसारामुळे जगभरात आर्थिक बदल दिसून येत आहेत. परिणामी नुकतेच बाजारातही काही बदल झाले आहेत. लसीच्या चाचण्या आशादायी नाहीत तसेच अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहेत.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की गुरुवारी सोन्याची किंमत १.३२ टक्के वाढून १९५३.५ डॉलर प्रति औंस झाली आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी रोजगार स्थिती सुधारणे व महागाई कमी करण्यासाठी नवी धोरणे आखली आहेत.

या धोरणांमुळे बाजाराच्या भावनांना आधार मिळाला आहे. बाजारात सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण दिसून आली. सोन्याच्या किंमतीत सुधारणेसाठी लागणारा वेळ दीर्घ असेल. त्यामुळे बाजारात प्रोत्साहनपर योजनांच्या प्रभावासाठी मदत मिळेल. याच प्रकारे, पिवळ्या धातूमुळे होणारे नुकसानही कमी होऊ शकते.

कोरोना बचाव विधेयकावरून अमेरिकी संसदेत अजूनही खोळंब्याची स्थिती असल्यानेही सोन्याला नुकसान होत आहे. अमेरिकी ट्रेझरी सेक्रेटरी स्टीवन म्युचिन हे या विलंबाविषयी प्रातिनिधिक मंडळासमोर सादरीकरण करणार आहेत.

कच्चे तेल :- गुरुवारी कच्च्या तेलात ०.०९% ची वृद्धी झाली व त्यांनी ४३.४ डॉलर प्रति बॅरलचे मूल्य कमावले. लोक साथीमुळे झालेल्या उत्पादनातील नुकसान भरून काढण्याची आशा करत आहेत. यामुळे मागणी वाढली व कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा झाली. मार्को चक्रिवादळ आणि ट्रॉपिकल स्टॉर्म लॉरा या दोन्ही संकटामुळे कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज १.५६ दशलक्ष बॅरलने घटले. किंवा मेक्सिकोच्या खाडीतील उत्पादन ८४ टक्के घटले, असेही म्हणता येईल. तथापि, उत्पादन क्षमतेला कोणतेही नुकसान झाले नाही, त्यामुळे तेलाच्या किंमतीत वेगाने सुधारणा होतील. कोव्हिडचा प्रभाव जस-जसा वाढत आहे तशी संक्रमित रुग्णांची संख्याही वाढत आहे. परिणामी कच्च्या तेलाची मागणी घटत आहे. अमेरिकी क्रूड यादी मागील आठवड्यात सुमारे ४.७ दशलक्ष बॅरलपर्यंत गेली होती. ती ३.७ दशलक्ष बॅरलपर्यंत जाण्याची अपेक्षा होती. घटत्या यादीच्या पातळीने तेलाचे नुकसान मर्यादित राखण्यास मदत झाली.

बेस मेटल्स :- या गुरुवारी, एलएमईवर बेस मेटल्सनी उच्चांकी स्थिती गाठली. यात झिंकला सर्वाधिक नफा मिळाला. अमेरिका आणि चीनदरम्यान लष्करी तणाव वाढत असून यामुळे व्यापार करारातील अपेक्षांवर परिणाम झाला. चीन आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध बिघडत राहिल्याने जागतिक आर्थिक स्थितीतही आणखी अडथळे निर्माण झाले. हे दोन देश धातूंचे सर्वात मोठे ग्राहक असल्याने आणखी काही कारणे घडल्यासही धातू बाजारावर परिणाम होऊ शकतो. चीनच्या कारखान्यात झालेल्या वृद्धीमुळे धातूंना काहीसा आधार मिळाला. चीनच्या स्टेनलेस स्टील उत्पादनात वृद्धीने झिंक आणि निकेलच्या किंमती वाढण्यास मदत मिळाली.

तांबे  :- एलएमई कॉपर गुरुवारी उच्चांकी स्थितीत ६५९४ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. कॉपर यादीत मोठी गच्छंती दिसून येत असल्याने आशा वाढल्या व लाल धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने धातूच्या किंमतींना आणखी आधार मिळेल. मात्र, अमेरिका-चीनदरम्यान संबंधांमुळे जागतिक बाजारात आणखी चिंता निर्माण होत आहेत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment