तहसीलदारांच्या आदेशानंतर ‘हे’ शहर बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत.

पारनेर तालुक्यातील सुपा शहरातही कोरोनाचे रुग्ण आहेत. याठिकाणी लोक सोशल डिस्टनचे पालन होत नाही तसेच शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन नागरिक करत

नाहीत म्हणून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्वरित सुपा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सुपा येथे तीन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध सुरू आहे.

यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे म्हणून सुपा तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान लक्षणे दिसत

असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. दरम्यान, हा आजार झपाट्याने पसरत

असल्याने सर्वतोपरी काळजी घेण्याचे आणि घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात ले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment