Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८०.४० टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५४७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३५, अँटीजेन चाचणीत १२३ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९५, संगमनेर ४९, पाथर्डी १०, नगर ग्रामीण २१, श्रीगोंदा ०१, पारनेर ११, राहुरी ०७, शेवगाव २७, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १२३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ०४,  राहाता १३, नगर ग्रामीण २५,  श्रीरामपुर ०७, कॅन्टोन्मेंट ०७, श्रीगोंदा ११, अकोले ०२, कोपरगाव २३, जामखेड ०४ आणि कर्जत २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २७४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३०, राहाता १७, पाथर्डी ०५,  नगर ग्रामीण ३२, श्रीरामपुर १६,  नेवासा ०९, श्रीगोंदा ०२, पारनेर ०८, अकोले ०५,  राहुरी ०४, कोपरगांव ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात एकूण ३५४७ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, मनपा १२९४, संगमनेर २४५, राहाता २२४, पाथर्डी १११, नगर ग्रा. २३२, श्रीरामपूर १६५, कॅन्टोन्मेंट ६४, नेवासा १०२, श्रीगोंदा १५८, पारनेर ९५, अकोले १५७, राहुरी १०१, शेवगाव ८४, कोपरगाव २४३, जामखेड १३३,  कर्जत १०२, मिलिटरी हॉस्पीटल ३४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५४६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २१९, संगमनेर ०९, राहाता ३०, पाथर्डी २५, नगर ग्रा. ४४, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट १२, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर २५, अकोले ०८, राहुरी ४०, शेवगाव १३, कोपरगाव ३०, जामखेड २१,  कर्जत ०८, मिलिटरी हॉस्पीटल ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत, एकूण १६७५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये, मनपा ६९५६, संगमनेर १३५६, राहाता ७७३, पाथर्डी ८३२, नगर ग्रा. १०५६, श्रीरामपूर ६७१, कॅन्टोन्मेंट ४६७, नेवासा ५९८, श्रीगोंदा ६३२, पारनेर ६७३, अकोले ३४५, राहुरी ३३१, शेवगाव ४८०, कोपरगाव ६२७, जामखेड ३९३,  कर्जत ४७३, मिलिटरी हॉस्पीटल ७३, इतर जिल्हा २० आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: १६७५७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३५४७
  • मृत्यू: २८१
  • एकूण रूग्ण संख्या:२०५८५

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button