भाजपा अध्यक्षांच्या ‘त्या’ कृतीस अण्णा हजारे यांचे तिखट उत्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप करत दिल्ली सरकारविरोधात भाजपने आंदोलन पुकारले. या आंदोलनात सहभागी व्हावे असे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भाजपने दिले.

भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी हजारे यांना पत्र लिहून भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. शिष्याविरुद्ध गुरूला लढ्यात उतरविण्याचा डाव भाजपने साधला अशी वानवा अनेकांनी पेटवली. यावर अण्णा हजारे यांनी त्यांच्या या पत्रास तिखट प्रतिक्रिया देत प्रतिउत्तर दिले आहे.

अण्णांनी सत्ताधारी भाजपाला माझ्या मदतीचे गरज का भासली? असा सवाल करत खरमरीत उत्तर दिले आहे. त्याला उत्तर देताना अण्णांनी म्हटले की, ‘ या पत्रामुळे मला फार वाईट वाटले आहे. भाजप हा मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत असून सर्वाधिक सदस्य असल्याचा दावा करणारे नेते,

मंदिरात १० बाय १२ फूट खोलीत राहणाऱ्या ८३ वर्षीय अण्णा हजारे यांना दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते. केंद्रात आपल्या पक्षाचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, कायदा-सुव्यवस्था, विजिलन्स,

दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल

तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत?’ असे प्रश्नच हजारे यांनी उपस्थित केले आहेत. ‘मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली

नाहीत. मला कोणत्याही पक्षाशी घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो आहे असेही अण्णांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment