धक्कादायक! नेवासा एसटी डेपोच्या आवारात चोरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नेवासा येथील एसटी डेपोच्या पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षकाने चोरी केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या आवारात असलेल्या तहसीलदार यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो उभा केला होता.

हा टेम्पो आणि येथील एका डम्परचे चार टायर त्याने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान चोरून नेलेला हा टेम्पो तहसीलदारांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी सुरक्षारक्षक दिगंबर शामराव ढाकणे याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नेवासा आगाराचे व्यवस्थापक किशोर मधुकर आहिरराव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, एसटी आगारामध्ये मोकळी जागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी तहसीलदार अवैधरित्या वाळू वाहतूक करताना

मिळून आलेल्या वाहनांवर कारवाई करणेकामी सदर ठिकाणी लावलेली आहे. 1 नोव्हेंबर 2019 रोजी अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो (एमएच 17 सी 9591) वाहन पार्किंगमध्ये लावलेला होता.

23 मे 2020 रोजी सुरक्षा रक्षकाने सांगितले की पार्किंगमध्ये लावलेले एक वाहन कमी आहे. त्यावेळी सुरक्षा रक्षक दिगंबर शामराव ढाकणे याचे ड्युटीच्या काळात आगारातून सदर 1 लाख 30 हजार 900 रुपये किंमतीचा टेम्पो

(एमएच 17 सी 6591) तसेच 3 हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू त्याचबरोबर पांढर्‍या रंगाच्या डम्परचे चार टायर चोरीस गेल्याचे दिसून आले. दरम्यान चोरीस गेलेला टेम्पो 17 जून 2020 रोजी तहसीलदार यांच्या पथकाने पुन्हा पकडून नेवासा डेपोत उभा केला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment