चिंता वाढली! कोकमठाणच्या ‘त्या’ वृध्देचा कोरोनाने मृत्यू; २३ रुग्ण नव्याने वाढले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत.

आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. काल कोपरगाव शहरासह तालुक्यात काल 23 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर कोकमठाण येथील एका 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सप्तश्रीमळा येथील 43 व 38 वर्षीय महिला तर 49 व 17 वर्षीय पुरुष, खडकी 24 पुरुष,भारत प्रेस जवळ 22 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील 43 वर्षीय पुरुष, इंदिरापथ येथील 22 वर्षीय पुरुष, धारणगाव रोड 18 वर्षीय महिला,

निवारा येथील 57 वर्षीय महिला, येवला रोड येथील 50 वर्षीय पुरुष, टिळकनगर येथील 27 वर्षीय पुरुष, दत्तनगर येथील 59 व 36 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील 60 व 40 वर्षीय महिला तर 82 वर्षीय पुरुष, गोरोबानगर येथील 50 वर्षीय महिला, सोनेवाडी येथील 63 वर्षीय महिला, कोळपेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष,

बहादरपूर येथील 40 वर्षीय पुरुष, पोहेगाव येथील 67 वर्षीय पुरुष धारणगाव येथील 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकारने रुग्णांच्या उपचारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली होती.

तसे पत्र त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले होते. एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडली तर त्यांना ऑक्सीजन, व्हेंटीलेटर लावण्याची गरज पडते. अशा वेळी वैद्यकीय साधने उपलब्ध नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचे अंतर दूर असल्याने वेळ जातो.

त्याचप्रमाणे रुग्णाच्या उपचारादरम्यान वापरले जाणारे विविध औषधेही उपलब्ध नसल्याने रुग्णांना तसेच नातेवाईकांना ही औषधे मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment