भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  गेल्या १ ऑगस्ट रोजी दूध दरवाढ व अनुदान देण्यात यावे तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात

आमदार मोनिका राजळे व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर महा दूध एल्गार आंदोलन करण्यात आल्याने

आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या इतर ३० ते ३५ पदाधिकाऱ्यांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रदेश भाजपाच्या वतीने दूध दरवाढ करण्यात यावी यासाठी १ ऑगस्ट २०२० रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन पुकारण्यात आले होते.

पाथर्डी येथे आमदार मोनिका राजळे व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.

कोविड १९ या रोगाच्या विषाणुचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमावबंदीचा आदेश दिलेला असताना आंदेलन केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment