सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे: स्टॉक मार्केटमधल्या घोटाळ्यांपासून रहा सावधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-ट्रेडिंगचा मुख्य उद्देश आपल्या गुंतवणुकीवर गलेलठ्ठ रिटर्न (ROI) मिळवणे हा असतो. दुर्दैवाने, अनेक घोटाळेबाज आणि फसव्या लोकांना या सुलभ पैशाच्या मोहात संधी दिसते. वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा गुंतवणूकदारांना पूर्ण अधिकार आहे,

पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. म्हणून, खाली काही टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मार्केटमधील घोटाळ्यांबाबत सावध होऊ शकाल आणि सुरक्षित ट्रेडिंग करू शकाल.

फसवणुकीचा सल्ला देणा-यांपासून दूर रहा: आजकाल शेकडो, हजारो फसवे लोक सल्लागार आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञाच्या रूपात स्वतःला सादर करत असतात. ते सामान्यतः विविध ऑनलाइन मंचांवर दबा धरून बसलेले असतात, आणि जर त्यांना ओळखण्याची क्षमता तुमच्यात नसली तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता खूप जास्त असते.

अडकता. नवख्या गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगचे बारकावे जाणून घेण्यासाठी सेबीने नोंदलेल्या गुंतवणूक सल्लागारांना सूचीबद्ध करणे हा तुम्हाला सामान्य नियमच वाटेल. परंतु, यात मोठा धोका असतो. तुमच्या खात्याच्या लॉग-इनचे तपशील इतर कोणाला सांगितल्यामुळे तुम्ही फसव्या लोकांचे सहज आणि सोपे लक्ष्य बनता.

तुमच्या वतीने निष्णात ट्रेडर्सनी ट्रेडिंग करण्याची कल्पना तुम्हाला सोयिस्कर वाटू शकते, पण त्यामुळे कदाचित तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. अशी सूट त्यांना मिळाल्यास, हे फसवे लोक खोटी खोटी ट्रेडिंग दाखवून तुमच्या खात्यात तोटा दाखवून तुमचे पैसे अन्य ट्रेडिंग खात्यात हस्तांतरित करू शकतात.

यात सगळ्यात त्रासदायक गोष्ट ही असते की, तुम्ही अगदीच अंधारात राहता, आणि तुमच्याबाबतीत असा घोटाळा झाला असल्याचा मागमूसही तुम्हाला लागत नाही. यावरचा उपाय म्हणजे, आपले लॉग-इन तपशील कोणालाही न देणे, कारण ते जर सिद्ध, टेक-प्रेरित नियामक चौकटीत बसणारे सोल्युशन नसेल

तर त्यामुळे कोणतीही तिर्‍हाईत व्यक्ती तुमच्या वतीने ट्रेडिंग करू शकते. तसेच तुम्हाला नीट माहिती नसेल अशा इन्स्ट्रूमेंट्समध्ये ट्रेडिंग करू नका. लॉग-इन तपशील अवांछित व्यक्तीला मिळाल्याने जर तुम्हाला काही तोटा झाला, तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. थोडक्यात म्हणजे, सर्वात योग्य मार्ग हाच आहे की, तुम्हाला व्यवस्थित ठाऊक असेल अशाच ठिकाणी ट्रेडिंग करा आणि तिर्‍हाईत व्यक्तीला यात प्रवेश देऊ नका.

पंप अँड डम्प योजनांपासून सावध रहा – आसपास त्यांचा वावर अजून आहे: अनेक चित्रपटांनी पंप अँड डम्प योजनांच्या चलनावर प्रकाश टाकला आहे आणि आता आर्थिक जगतासाठी काही हे नवे राहिलेले नाही. परंतु, माणसाचा लोभ अशा अवैध कार्यपद्धतींना खत-पाणी पुरवतो.

हा कट मायक्रो आणि स्मॉल-कॅप स्टॉक्सच्या बाबतीत राबवला जातो, कारण ते सोपे असते. ज्याला ऑनलाइन ट्रेडिंग खात्यात प्रवेश आहे आणि भाव वाढण्याच्या आशेत गुंतवणूकदारांना स्टॉक खरीदण्यासाठी पटवण्याची कला ज्याला अवगत आहे, तो हे सहज करू शकतो.

मूलतः ही योजना राबवण्यासाठी घोटाळेबाज कमी प्रमाणात ट्रेड होत असलेला स्टॉक मोठ्या संख्येत खरीदतात, त्यामुळे त्याची किंमत अचानक जोरात वाढते. यात हे लोक ऑनलाइन असे संदेश देखील पोस्ट करतात, की आतली बातमी मिळाली असून त्या शेअरचे भाव खूप वाढणार आहेत.

याला बळी पडून गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली की, घोटाळेबाज आपले शेअर्स विकून टाकतात त्यामुळे भाव पडतो आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होते. शेअरचे भाव चढण्याचे भाकीत करणार्‍या अवांछित सूचनांपासून सावधान राहण्यात सुरक्षा आहे. सूचनांचा स्रोत नेहमी तपासून बघा आणि धोक्याची सूचना ओळखा.

अशा सूचना सर्वसाधारणपणे पेड प्रमोटर्स आणि आतल्या लोकांकडून येतात. जर एखादा ईमेल किंवा न्यूजलेटर याबद्दल काही-बाही सांगत असेल आणि त्याच्याशी संबंधित धोक्याचा उल्लेखही करत नसेल, तर ती धोक्याची सूचना आहे हे जाणून सावध व्हा. खरे म्हणजे, शेअर खरेदी करण्यापूर्वी तुम्हीच त्या स्टॉकचा अभ्यास करा.

परवलीचा शब्द: गुंतवणूक करताना आपले कवच कधीही दूर न करणे हीच गुरुकिल्ली आहे. म्हणजे, अशा टिप्सवर विश्वास ठेवू नका, ज्या झटपट आणि लाभदायक रिटर्नची हमी देतात. गुंतवणूक करण्यापूर्वी शक्य तेवढा अभ्यास स्वतःच करा. प्रचार करणारी न्यूजलेटर्स,

सूचना आणि ईमेल यांच्या बाबतीत व्यवसाय आणि प्रमोटर्सच्या अस्सलतेची खात्री करून घ्या. हे लक्षात ठेवा की, बरेच घोटाळेबाज शॉर्टकोड वापरुन एसएमएस पाठवतात, ज्यामुळे एखादी प्रतिष्ठित ब्रोकरेज कंपनी असल्याचा आभास होतो.

ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि शेवटी, पेनी (लहान) स्टॉकपासून लांब राहा. आपले पैसे गमावण्याची तुमची तयारी असली तरच त्यात गुंतवणूक करा.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment