‘मी सुशांत प्रकरण केसचे अपडेट ठेवत नाही’ ठाकरे सरकरमधील ‘हे’ मंत्री म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता हा तपस CBI करत आहे.   आता  या  संबंधी  बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले कि ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा मी फारसा आढावा घेत नाही.

त्या केसचे मी रोजचे अपडेट ठेवत नाही, पण कायद्याने जी चौकशी चालू आहे, या चौकशीमधून जे बाहेर येईल ते कळेलच,’ असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी भवन या ठिकाणी ते शनिवारी आले असता बोलत होते. दरम्यान या प्रकरणानंतर भाजपने आघाडी सरकारवर अनेक आरोप केले.

तेव्हा त्याचा आ. रोहित पवार यांनी समाचार घेत म्हटले होते की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या करणं हे क्लेशदायक आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये. बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळी भाजू नका,

असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं होत. तनपुरे यांना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत भाजपने केलेल्या आंदोलनाविषयी  विचारले असता ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने जो अंतिम परीक्षेबाबत निर्णय दिला आहे, त्यानुसार आमचे काम चालू आहे.

त्यामुळे भाजपचे आंदोलन कसे झाले? याचा मी आढावा घेतला नाही. परंतु याबाबत सरकार जी भूमिका घेत आहे, ती सर्वसमावेशक व लोकांची सुरक्षा बघून घेत असते. याबाबत मुख्यमंत्री योग्य भूमिका घेतील. त्यामुळे धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मी माझे व्यक्तिगत मत देऊ शकत नाही. असेही ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment