पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

याबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामधील महापालिकेच्या हद्दीतील येरवडा ते खराडी पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या

सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती.

त्यावर पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीला आमदार टिंगरे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा झाली.

त्यात पवार यांनी येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहापदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर करायचे यासंबंधीचा आराखडा करावा, अशी सूचना केली.त्यासाठी जवळपास 3 हजार कोटींचा खर्च येईल, असा अंदाज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment