रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- प्रशासनावर व डॉक्टरांवर दबाव आणून त्यांना योग्य पद्धतीने काम करू दिले जात नाही. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट कमी करून कोरोना कमी झाल्याचे भासविण्यात येत असल्याचा व जनतेच्या आरोग्याशी खेळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या वस्तीगृहात उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरला अचानक भेट दिली व येथील रुग्णांबरोबर सुरक्षित अंतर ठेवत चर्चा केली.

येथील व्यवस्थेबाबत माहिती घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड व आरोग्य विभागाचे कर्मचारी, सुनील यादव उपस्थित होते. या भेटीनंतर माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कर्जत तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असताना ज्यांना आरोग्याबाबत काही ज्ञान नाही त्यांनी या विषयावर बोलू नये.

अन्यथा ते लोकांच्या जीवनाशी खेळल्या सारखेच होते. सातत्याने टेस्ट झाल्या पाहिजेत पण सतत टेस्ट कमी केल्या जातात अशा तक्रारी येत आहेत. लोकांना या आजारात लवकर निदान होऊन लवकर उपचार मिळाले तर ते लवकर बरेही होतात. सर्वत्र महाराष्ट्रात, देशात व जगात अशी पद्धत अवलंबली जात आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या विषयात ज्यांना कोणाला याचे ज्ञान नाही अशा व्यक्तींनी डॉक्टर वरती प्रशासनावरती दबाव न आणता जर काम केले तर यातून आपल्याला लवकर मुक्ती मिळू शकेल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment