प्रवरेत वाहून गेलेला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-प्रवरा नदीवरील संगमनेर येथील जुन्या छोट्या पुलावरून मोटारसायकवरून जाणार्‍या दोघा युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.

काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एकजण बचावला दुसरा मात्र वाहून गेला होता. शरद कोल्हे असे वाहून गेलेल्याचे नाव होते. काल सकाळी त्याचा मृतदेह वाघापूर शिवारात नदीपात्राच्याकडेला पाण्यावर तरंगताना आढळून आला.

संगमनेर शहरालगतच्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वेगाने वाहत होते. तालुक्यातील कोळवाडी येथील शरद धोंडीबा कोल्हे व सुनील चांगदेव आहेर हे आपल्या प्लॅटिना मोटरसायकलवरून पुलावरून जात होते.

मात्र त्यांना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नाही. पुलाच्या मध्यभागीच त्यांची गाडी बंद पडली. नदीच्या पुलावर पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने ते मोटरसायकलसह पाण्यात बुडाले.

यातील सुनील आहेर याने नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाच्या फांदीचा आधार घेतला. तो पुरात बुडत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी मोठ्या धाडसाने त्याला बाहेर काढले.

शरद कोल्हे मात्र वाहून गेला होता. या तरुणाचा रविवार दिनांक 23 पासून त्याचे नातेवाईक व कोल्हेवाडी येथील ग्रामस्थ शोध घेत होते.

कोल्हेवाडीचे तलाठी बाजीराव गडदे, संजय कोल्हे यांसह पट्टीच्या पोहणारांनी देखील निंबाळे, वाघापूर, खराडी, जोर्वे परिसरात प्रवरा नदीच्या दुतर्फा या तरुणाचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही.

अखेर काल सकाळी वाघापूर शिवारात पुणे बायपास रोडवर असलेल्या प्रवरा नदीपात्रावरील पुलाच्या खालच्या बाजूने त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment