दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असणारे ‘हे’ धरण ओव्हरफ्लो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

जायकवाडी, मुळा हे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. आता दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरण समुहातील सर्वाधिक क्षमतेचे डिंभे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

या धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता 12500 दलघफू आहे. आता या धरणात पाणीसाठा काल (शनिवार) 12030 दलघफू (97 टक्के) झाला. या पाण्याचा लाभ नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, जामखेडला होतो.

पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे धरणात 1303 दलघफू पाणीसाठा या धरणात असून माणिकडोहमध्ये 4020 दलघफू (39.49टक्के) पाणी आहे. घोड धरणातील पाणीही वाढत असून 5555 दलघफू (93 टक्के)पाणीसाठा झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment