चिंताजनक ! तीन डॉक्टरांसह 23 जणांना कोरोना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

आता सामान्यांबरोबच डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काल श्रीरामपूर तालुक्यात तिघा डॉक्टरांसह 23 जण कोरोना बाधित आढळले आहेत.

आता तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 772 इतकी झाली आहे. आजपर्यत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये तीन बाधित डॉक्टर हे कोरोना रुग्णांसाठी काम करत होते.

यातील एक जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात स्त्राव घेणे व रॅपीड टेस्ट घेण्यासाठी पूर्णवेळ काम करत होते. तसेच वॉर्ड नं.

सात-6, निपाणीवडगाव- 10, मालुंजा -2, पढेगाव-1, गोंधवणी-1, जिजामाता चौक-1, वॉर्ड नं. सहा-1, शिसरगाव-1 असे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान काल 20 जणांना कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment