खा.विखे म्हणतात, केंद्राच्या ‘क्लस्टर’ योजनेत ‘हे’तालुके आणणार; जाणून घ्या काय आहे ही योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना. या योजनेअंतर्गत यापूर्वी शेवगाव, जामखेड, पाथर्डी तालुक्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.

आता फेज दोनसाठी श्रीगोंदा, नगर आणि पारनेर या तालुक्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूतोवाच केले.

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न केले जातात. खा.डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 नगर- दौंड- बीड व अन्य विषयासंदर्भात बैठक आयोजित केली होती.

यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीतून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 च्या भूसंपादनाबाबत व त्याच्या भूसंपादन रकमेच्या बाबत आढावा घेउन लवकर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

क्लस्टर योजना म्हणजे काय ?:- वसाहती इमारतींचा समूह पुनर्वकिास वा जुन्या मालमत्तेचे पुनर्निर्माण योग्य व नियंत्रित स्वरूपात करण्याचे धोरण म्हणजे एक हेकटर क्षेत्रात जवळ-जवळच्या मालमत्तांचा एकत्र गट करून जमिनीचा विकास करणे,

तेथील रहिवाशांसाठी तिथेच निवासी क्षेत्र तयार करून 4 FSI मुळे उपलब्ध झालेल्या मोकळ्या जागेत बाग, रस्ते, शाळा, समाजमंदिर, व्यायामशाळा इ अनेक नागरी सुविधा पुरविणे व तेथील वस्तीमधील सांडपाणी, कचरा यांच्यासाठी नाले, गटारे सुनियंत्रीत पद्धतीने विकसित करून इतर क्षेत्रांशी जोडणे.

हे सर्व बांधकामे करणारा विकासक त्याच्या खर्चासाठी व फायद्याच्या रकमेपोटी अन्य निवासी व कमर्शियल मालमत्ता बनवून विकू शकतो. या पूर्ण योजनेला ढोबळमानाने समूह विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट असे संबोधित केले जाते.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment