Ahmednagar NewsMaharashtra

शारीरिक तंदुरूस्ती ही काळाची गरज – बाबासाहेब चोरमले

शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत ऑनलाईन क्रीडा दिन साजरा

संदीप घावटे, 31 ऑगस्ट 2020 :-  शारीरिक तंदुरूस्ती ही काळाची गरज आहे .या कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने तंदुरुस्त रहावे असे प्रतिपादन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बाबासाहेब चोरमले यांनी क्रीडा दिनी व्यक्त केले .शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऑनलाईन साजरा करण्यात आला .त्यावेळी ते बोलत होते .

भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतात , शाळा व महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरा केला जातो . यंदा मात्र कोरोना महामारीमुळे शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे सोशल डिस्टन्स ,

मास्कचा वापर इत्यादी कोरोना विषयी नियमांचे तंतोतंत पालन करून राष्ट्रीय क्रीडा दिन प्रशालेत ऑनलाईन पदधतीने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व प्रशालेचे माजी क्रीडाशिक्षक बाबासाहेब चोरमले उपस्थित होते .

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल तांबोळी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच आहार व व्यायामाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली . उपमुख्याध्यापक योगेश जैन,पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे,

पर्यवेक्षक बी.आर .शिंदे व विज्ञान विभाग प्रमुख राजेंद्र वालझडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी इयत्ता नववीच्या वर्गातील १५० विद्यार्थी ऑनलाईन कार्यक्रमाचा वेगळा अनुभव घेत होते. प्रशालेचा बुद्धीबळ खेळातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र बुद्धीबळ संघाचे दोनदा कर्णधार पद भूषविणारा

तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू संकर्ष शेळके याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यकमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संजय शेळके यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक सचिन रासकर यांनी केले. क्रीडा प्रतिज्ञेचे वाचन बाबासाहेब चोरमले यांनी केले .

यावेळी क्रीडाशिक्षक भास्कर करंजुले, संतोषकुमार देंडगे , नामदेव भांगले ,संदिप तानवडे,प्रकाश देवकर, नामदेव हिवरकर, कल्पना भोगावडे, छाया वेताळ प्रशालेच्या गीतमंचातील अध्यापिका अलका रूपनर ,विवेकानंद क्षीरसगार,विवेक घोडेराव व प्रशालेतील अध्यापक उपस्थित होते .

या प्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमारजी बोरा , उपाध्यक्ष चंद्रकांतभाऊ बाफणा , सचिव गुरुवर्य तु . म . परदेशी यांनी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून सर्व क्रीडा शिक्षकांना व खेळाडूंना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या . सर्व मान्यवरांचे आभार क्रीडा शिक्षक मच्छिंद्र बनकर यांनी मानले .

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button