ठाकरे सरकारही लागले पदवी परीक्षेच्या तयारी; घेतला महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सरकारही पदवी परीक्षेच्या तयारीला लागले आहे. या संदर्भात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सरकार पदवी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करत आहे. विद्यार्थ्यांवर दबाव येऊ नये यासाठी कमी गुणांची परीक्षा असेल असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

Advertisement

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा

अशी सूचना कऱण्यात आली आहे”. “मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत,” अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

Advertisement

“पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

“विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली.

Advertisement

” असं उदय सामंत यांनी सांगितलं. “परीक्षा कशी पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाणार आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं. “विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही, घरातच परीक्षा देता आली पाहिजे यावर कुलगुरुंच एकमत झालं आहे.

७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची करोना संकटात परीक्षा घेणं फार जिकीरीचं काम आहे. मात्र कुलगुरु हे योग्य पद्धतीने पार पडेल याबद्दल आशा आहे,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते,

Advertisement

मात्र परीक्षा होणारच असं स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement