जनावरांच्या बाजारावरही कोरोनाचे संकट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. सलग दोन महिने लॉकडाउन करूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने नगर जिल्ह्यात जनावरांच्या बाजारासह गावखेड्यातील छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद आहेत.

पाच महिन्यांपासून जनावरांची खरेदी-विक्री तर बंद आहेच. पण, छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद असल्याने जिल्हाभरातील सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक बाजारांतील किरकोळ विक्रेत्यांवर बाजार बंद असल्याने

उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आधी कोरोना आता लंपी स्कीन डिसीज या आजाराने डोकेवर काढले असल्याने शेतकरी जनावरांची खरेदी विक्री टाळतांना दिसत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात दरवर्षी राज्यातील अन्य जिल्ह्यासह पर राज्यातून व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येत होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पशूधनाचा व्यापार ठप्पच झाला आहे.

एकीकडे शेतकर्‍यांच्या दुधाला भाव नाही, तर बाजार सुरू नसल्याने शेतकर्‍यांना त्यांची जनावरे विक्री करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे मोठ्या 2 लाख जनावरांची खरेदी-विक्री होत असून त्यातून कोट्यावधी रुयांची उलाढाल सुरू होती.

मात्र, करोनाच्या संकाटमुळे जनावरांचे बाजारच उध्दवस्त झाले आहेत. लोकांची गरज पाहता आठवडी बाजार, जनावरांचे बाजार सुरू होणे गरजेचे आहे.

परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजार सुरू करणे तसे अडचणीचेच ठरणारे आहे. कारण, बाजारात दूरवरून व्यापारी व लोक येतात. त्यामुळे अधिक संसर्ग वाढण्याची भीती असते असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment