बिबटयाचा थरार ; शेळ्या-मेंढ्यांचा फडशा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील भगवानगड पंचक्रोशीतील मालेवाडी गावामध्ये शिरलेल्या बिबटयाने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे. येथील शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच बिबट्याने पवळागड वस्तीवर शेतकर्‍यांच्या घराबाहेर मुक्काम ठोकल्याने पवळागड वस्तीमधील शेतकर्‍यासह भगवानगड परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे पुढील जिवितहानी होण्यापुर्वी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी विठ्ठल किर्तने व परिसरातील नागरीकांनी केली आहे.

मागील काही वर्षांपासून गावात बिबटय़ाचे दर्शन होत आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा हा फटका आहे. बिबटय़ाला जाळय़ात पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment