अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे पत्रकाराचे निधन,व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- पुण्यात ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहीनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार  पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं.

पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हार्ट ऍटॅक आल्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. 

पांडुरंग रायकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील होते,त्यांचे ( इयत्ता ११ वी व १२ वी – शास्त्र शाखा) शिक्षण श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात झाले होते. ते सौ.चांदणी खेतमाळीस (श्रीगोंदा) यांचे बंधू होते.

पांडुरंग रायकर यांनी यापूर्वी त्यांनी ABP माझा चे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही काम केल होत. रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.

त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काल पुणे शहरातील सर्व सरकारी, खासगी रुग्णालयात दिवसभर करोना बाधितांसाठी आयसीयू व्हेंटिलेटरच्या खाटाच उपलब्ध नव्हत्या. सर्व रुग्णालयातील खाटा फुल्ल असल्याचे लाइव्ह डॅशबोर्डवर दिवसभर दाखवले जात होते.पत्रकार पांडुरंग रायकर यांचेही व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने निधन झाले आहे.

याबद्दल ABP माझे चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनीही फेसबुक वर एक पोस्ट लिहिली आहे –

अहमदनगर Live24 च्या वतीने पत्रकार पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment