त्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह इतरांवर गुन्हे दाखल करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या सावेडी येथील डॉनबॉस्को विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर संबंधीत व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

सदर मागणीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांना निवेदन देऊन या प्रकरणी चर्चा करण्यात आली. यावेळी पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबरे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, राजू भिंगारदिवे, राहुल बरबडे उपस्थित होते.

सावेडी येथील डॉनबॉस्को विद्यालयाने 17 जानेवारी 2019 रोजी शिक्षण विभागाच्या परवानगीविना खाजगी बसणे (लक्झरी) वसई विरार येथे बेकायदेशीर सहल नेली होती. प्रवासामध्ये आळेफाटा (जि. पुणे) परिसरात सदर बसचा अपघात होऊन त्यामध्ये या शाळेचा एक शिक्षक, लक्झरी बसचा क्लिनर, अपघात ग्रस्त टेम्पोचा ड्रायव्हर अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

तर या अपघातामध्ये 22 ते 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. शिक्षण विभागाची परवानगी न घेता खाजगी लक्झरी बसने शालेय विद्यार्थ्यांची सहल काढणे, सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर कृत्य होते. हा ठपका ठेवत शिक्षण विभागाने चौकशीमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक आणि इतरांना दोषी ठरवले आहे.

मात्र सदर संस्थेने अथवा शिक्षण विभागाने सदर मुख्याध्यापक व इतर दोषी व्यक्तीवर या अपघाताची गंभीरता लक्षात न घेता कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तीन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले व 22 ते 25 विद्यार्थ्यांना गंभीर इजा पोहचविणारी घटना गंभीर स्वरुपाची आहे.

भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, सहल प्रमुख व या घटनेशी संबंधीतांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment