अहमदनगर ब्रेकिंग : एसटी घरात घुसली… वाचा कुठे घडला हा विचित्र अपघात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर हुन अहमदनगरला येणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात बसने कारला धडक देऊन एका घरात घुसल्याची घटना विळद घाटात सायंकाळी घडली.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर हुन प्रवासी घेऊन बस नगरकडे येत असताना एसटी बसला अपघात झाला. यामध्ये एसटी चालकाने टेम्पो आणि कारलाही दिली धडक दिली .

त्यामुळे बस विळद घाटातील एका घरात घुसली.या बसने पत्र्याचे शेड आणि संरक्षक भिंत तोडून घराच्या स्लॅबला धडक दिली .या अपघातात एसटीच्या काचा फुटल्या, बाकेही तुटली.

एसटी बसमध्ये 10 ते 12 प्रवाशी प्रवास करत होते.या अपघातात अनेक प्रवाशांना मार लागला त्यांना नगरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment