गणेश विसर्जन शांततेत, सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर शहरात व तालुक्यात ग्रामीण भागात गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेने व ग्रामपंचायतीने गणेश मूर्तींसह निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर वाहनांची व्यवस्था केली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन स्थळी गर्दी टाळण्यासाठी नदीपात्रावर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. श्रीरामपूर तालुक्यात कोणताही अनूचित प्रकार न घडता गणेश विसर्जन शांततेत पार पडले.

दरम्यान, गणेश विसर्जनावरून सतताधारी गटातच आरोप-प्रत्यारोप झाले. नगराध्यक्ष अनुराधा आदिक म्हणाल्या, आरोप करणाऱ्यांनी बेताल आरोप करून सामाजिक कलह निर्माण करण्यापेक्षा आपल्या डोक्यातील कचरा काढून टाकावा.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रींचे विसर्जन आपल्या दारी या अभियानात शहरात गणेश मूर्ती संकलित करून विसर्जित करण्यात आल्या.

श्रीरामपूर शहरात पालिकेने ७ वाहनांची व्यवस्था केली होती, असे सांगितले. आपल्या दारी या अभियानात शहरात गणेश मूर्ती संकलित करून विसर्जित करण्यात आल्या.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment