Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingLifestylePolitics

मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नाहीत; गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

जिल्ह्यातील विविध गावातील परिस्थिताचा आढावा, नागरिकांना सांत्वन भेटी, प्रबोधन कार्यक्रम, कोविड सेंटरची पाहणी या पद्धतीचे कार्यक्रम आखले आहेत. या काळात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या विरोधकांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत अपक्ष विजयी झाल्यानंतर शंकरराव गडाख यांची राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपला साधेपणा जपत मंत्रिपदाची कुठलीही हवा डोक्यात जाऊ न देता काम चालू केले. तसे जवळच्या कार्यकर्त्यांनासुद्धा कानमंत्र दिला.

सत्ता येते जाते पण जनसामान्यांची नाळ तोडू नका. असे आवाहन केलं होत. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाउन लागला आहे. त्यानंतर करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे उपाययोजनेच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवत त्यांना नामदार गडाख यांनी सूचना केल्या.

मागील महिन्यात त्यांनी नेवासा फाटा व शिंगणापूर येथील कोविड सेंटरला भेट देत थेट रुग्णांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तालुक्यातील गडाखांच्या या भेटीतून त्यांच्या विरोधकानीं सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचा आरोप केला आहे. नामदार गडाखांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

मंत्री गडाख यांचा पाथरवाला, नजीक चिंचोली, नेवासा शहर, प्रवरासंगम, चिलेखनवाडी, गेवराई अशा विविध ठिकाणी बैठकी घेतल्या आहेत. गडाख समर्थक या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर पसरवत आहे तर विरोधक सोशल डिस्टन्स पळत नाही म्हणून गडाखांवर कारवाईची मागणी करत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button