Ahmednagar NewsCorona Virus Marathi News

कोरोनावर मात करत पोलीस निरीक्षक कर्तव्यावर रूजू

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर हजर झालेल्या पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी स्वागत केले. नगरच्या पोलिस नियंत्रण कक्षात पोवार हे सध्या कर्तव्यास आहेत.

तेथे काम करीत असताना त्यांना त्रास होउ लागल्याने कोरोनाची चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी नगरच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कुटुंबियांनाही झाली होती कोरोनाची लागण पोलीस निरीक्षक पोवार हे उपचार घेत असतनाच त्यांच्या कुटूंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यामुळे पोवार यांच्यासह कुटूंबालाही उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सर्व कुटूंब कोरोनामुक्त झाले आहे.

दरम्यान काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पोवार गुरूवारी कर्तव्यावर रूजू झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी त्यांचे स्वागत केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button