महिलाही आता वाळूतस्करीत, पहिलाच गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  अवैध वाळूतस्करीतील पुरूषांचे वर्चस्व मोडीत काढत पळशी येथील महिला वाळूतस्करीत सहभागी झाल्या आहेत.

पोलिसांनी विमल रामचंद्र गागरे हिच्याविरोधात १ लाख ६८ हजार किमतीच्या ४० ब्रास वाळूचा अवैध उपसा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वाळूचोरीचा गुन्हा दाखल झालेली तालुक्यातील ही पहिलीच महिला आहे.

तलाठी राम शिरसाठ यांनी या महिलेविरोधात वाळूचोरीची फिर्याद दिली. दरम्यान, बुधवारी पहाटे तहसीलदार ज्योती देवरे यांनी कडूस येथे वाळूतस्कराला मालमोटारीसह ताब्यात घेतले.

महसूल, गौण खनिज विभाग व वाळूतस्करांच्या लागेबांध्यांमुळे अनेक वर्षांपासून नदीपात्रातील वाळूसाठ्यांचे लिलाव झालेले नाहीत. वाळूउपसा मात्र अविरत सुरू आहे.

त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे, त्याचबरोबर पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. पळशी येथील वाळूतस्करी करणाऱ्या गागरे या महिलेविरोधात दिलेल्या फिर्यादीत तलाठी शिरसाठ यांनी म्हटले आहे की,

नदीपात्रातील वाळूसाठ्यांचे लिलाव झालेले नसताना, कोणतीही परवानगी न घेता गागरे यांनी अवैधरित्या ४० ब्रास वाळूचा उपसा केला. तहसीलदार देवरे यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवत भल्या पहाटे कारवाई केली.

कडूस शिवारात वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटारीच्या चालकासह मालमोटार (एमएच१२ एमव्ही.४४४१) ताब्यात घेतली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment