करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा पुढाकार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  करोना संकट काळात विविध मागण्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात उतरणारे भाजप आता करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे. नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.

करोना ही राष्ट्रीय अपत्ती असून उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे, त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामात अधिक सक्रीय होण्याचा निर्णय घेतल्याचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सांगितले.

महौपार बाबासाहेब वाकळे व गंधे यांच्या उपस्थित ही बैठक झाली. आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करोनासंबंधी विविध मागण्या केल्या, निवेदने दिली, आंदोलनेही केली. आता मात्र, थेट प्रत्यक्ष कामात सहभागी होण्याचे ठरविण्यात आले आहे.

यावेळी बोलताना गंधे म्हणाले, नगर शहरात करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. यामध्ये जनतेला सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला पन्नास व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी भाजपाच्यावतीने नगर शहरामध्ये उपाययोजना करण्यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर तसेच आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर यांना एकत्रित करुन काम करणार आहे.

भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांची ११ जणांची समिती तयार करुन नागरिकांना कोरोना संदर्भात मदत करणार आहेत. नि:स्वार्थ सेवा महापौर वाकळे म्हणाले की, कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता भाजपचे कार्यकर्ते नि:स्वार्थपणे जनतेला सहकार्य करत आहेत.

गेल्या सहा महिन्यामध्ये महानगरपालिकेला सरकारने कुठलीही आर्थिक मदत दिलेली नाही. शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून करोना सेंटरची उभारणी केली. नगरकरांना दिलासा देण्याचे काम केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment