अधिकारी असल्याचे सांगत भामट्यानी सोन्याची चैन लांबवली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, फसवणूक चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा येथे दोन भामट्याने सीआयडीत अधिकारी असल्याचे सांगत एकास लुटल्याची घटना घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भीमराव कवडे नामक व्यक्तीचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी जात होते.

यावेळी जुन्या स्टेट बँकेजवळ एका दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने कवडे यांना अडविले. या दोघांनी कवडे यांना आपण सीआयडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच त्यांना बनावट ओळखपत्र देखील दाखवले.

तुमच्या गावात गोंधळ झालाय. तुमच्याजवळील वस्तू काढून रुमालात बांधा, असे सांगून कवडे यांच्याजवळील एक सोन्याची चैन दोन भामट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता दौंड-जामखेड रस्त्यावर घडली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment