Ahmednagar News

न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरु करावे

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारीच्या टाळेबंदीत तातडीचे प्रकरण वगळता इतर प्रकरणांचे कामकाज बंद असून, अटी शर्थीसह न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सच्या शिष्टमंडळाने प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

तर सदर मागणीचे निवेदन मुख्य न्यायमुर्तींना पाठवून सदर प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. सुभाष लांडे, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अ‍ॅड. संदीप म्हस्के, अ‍ॅड. सुधीर बाफना, अ‍ॅड. प्रकाश हिवाळे, अ‍ॅड. अतिश लांडे उपस्थित होते.

गेल्या पाच महिन्यापासून न्यायालय फक्त तातडीच्या कामकाजासाठी सुरू आहे. टाळेबंदी सुरु होण्यापुर्वी दाखल केलेली अनेक प्रकरणे पूर्णपणे थांबली आहे. लॉकडाऊनमुळे बहुसंख्य वकिलांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सर्व जीवनमान सुरळीत होत असताना न्यायालयाची कामकाज मात्र पुर्वपदावर येताना दिसत नाही.

अनेक व्यवसाय, उद्योगधंदे व वाहतुक व्यवस्था कोरोनाच्या संकटात नियमांचे पालन करुन काळजी घेऊन सुरु झाल्या आहेत. नियमांचे पालन करुन न्यायदान प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. सामाजिक स्वास्थ्यसाठी हॉस्पिटलप्रमाणे न्यायालयाची समाजाला गरज आहे.

मागील पाच ते सहा महिन्यापासून न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने त्याचा परिणाम वकिलांच्या व्यवसायावर झाला आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह, तर कोणी भाडे तत्वावर राहत आहे. तातडीच्या प्रकरण वगळता सर्व प्रकरणाचे कामकाज बंद असल्याने वकिलांपुढे मोठा आर्थिक प्रश्‍न उभा राहिला आहे.

न्यायालय बंद असेपर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने सर्व वकिलांना दरमहा 15 हजार मानधन द्यावे, वकील हा न्यायदानासाठी महत्त्वाचा घटक असल्याने सर्व वकिलांना 50 लाखाचे विमासंरक्षण द्यावे, दोन सत्रातील कामकाज बंद करून सर्व न्यायालयाचे नियमित पूर्णवेळ

कामकाज पूर्ववत सुरू करावे, कामकाज सुरु केल्यानंतर न्यायालयात कोरोना तपासणीची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button