मित्रांचा डीजे डान्स नवरदेवाला भोवला

file photo

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  वांबोरी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला व हा विवाहसोहळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. लग्न समारंभ आटोपला नवरी देखील नवरदेवाच्या घराकडे निघाली.

नवरीला घेऊन वऱ्हाडी खडांबे खुर्द येथील घरी परतले. लग्न म्हंटले कि मित्रांचा थाट हा वेगळाच असतो. परंतु याच थाटापायी नवरदेवाला चांगलाच फटका बसला आहे. सायंकाळी मित्रपरिवार व नातेवाईकांनी बैठक झाली व गावातून वरात मिरवायचीच ठरले.

Advertisement

वांबोरी येथील डीजे बोलविला. रात्री नऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत गावभर वरात मिरली. डीजेच्या आवाजाने गावकऱ्यांची झोप उडाली. एका संतापलेल्या व्यक्तीने रागाच्या भरात 100 क्रमांक डायल केला. तक्रार नोंदविली.

कोरोनाच्या संकटात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 31) सकाळी नवरदेवाला राहुरी पोलिस ठाण्यात बोलाविल्याचा निरोप धडकला.

Advertisement

“डीजे नव्हता. छोटा साऊंड बॉक्‍स होता..’ असे सांगणाऱ्या नवरदेवाला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवण्यात आले. नवरदेवाला पोलिसी खाक्‍या दाखविताच, मित्रांची धावपळ उडाली.

डीजे मालकासह सविस्तर माहिती पोलिसांना समजली. पोलिस कॉन्स्टेबल आजिनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

पोलिसांनी नवरदेव, नवरदेवाचे वडील आणि डिजे मालकावर गुन्हा दाखल केला. तसेच दीड लाखांचा डिजेचा टेम्पो, 20 हजारांचा 40 किलोवॅट क्षमतेचा जनरेटर, 20 हजार रुपयांचे दोन साऊंड बॉक्‍स, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement