Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

0

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारताची नुकतीच जडणघडण होत आहे. देशाच्या पंतप्रधान यांच्या आत्मनिर्भर धोरणांना चालना देण्यासाठी आता नगरकर सरसावले आहे.

नगरमधील चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांची भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या कार्यकारिणी सदस्यपदी तसेच आत्मनिर्भर भारत प्रमुखपदी निवड झाली आहे.

उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रदीप पेशकार आणि प्रभारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योग आघाडी प्रदेश कार्यकारणीची घोषणा केली.

त्याअंतर्गत नगरचे उद्योजक अनंत देसाई यांची उद्योग व्यवसाय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी व आत्मनिर्भर भारत प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

या निमित्ताने महाराष्ट्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व नवोदित उद्योजकांना प्रेरणा मिळण्यासाठी प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र विकासाच्या उपक्रमात सहभागी होऊन

महाराष्ट्र देशात अग्रेसर राहावा तसेच भारत आत्मनिर्भर करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्णत्वास यावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले.

या निवडीबद्दल देसाई यांचे भाजपच्या नगर शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी,आमदार, खासदार व भाजप कार्यकर्ते, उद्योजक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

li