Ahmednagar CityAhmednagar News

अतिक्रमण हटवायचे कि नाही? मनपा संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- नगर शहर व शहरातील अतिक्रमणे हे नेहमीच नागरकरांसाठी चर्चेचा विषय ठरलेली आहेत. वर्षानुवर्षे शहरातील अतिक्रमणे वाढत असताना देखील लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल हा नेहमीच नगरकरांना पडलेला असतो.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्टेशन रोडवरील अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी नागरिकंनी ओरड केली होती. आता हेच अतिक्रमणाचा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी मागील २ सप्टेंबरला ज्या नागरिकांनी सह्यांचे निवेदन देऊन मनपा आयुक्तांना केली होती,

त्याच नागरिकांनी आता घुमजाव करीत त्या निवेदनावर आमच्या फसवून सह्या घेतल्य़ाचा दावा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवायची की नाहीत, याचा प्रश्न महापालिकेसमोर सध्या तरी नाही तर अतिक्रमणे हटवण्याची मागणी करणारे खरे कोण आहेत,

य़ांचा शोध घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. अतिक्रमणे हटवा अथवा आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले होते. त्या निवेदनावर संबंधित परिसरातील नागरिकांच्या सह्या असल्याचे सांगितले जात होते. हे निवेदन दिल्यानंतर त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर दोनच दिवसात या निवेदनाला आक्षेप घेतला गेला.

*माजी नगरसेवकाचे कारस्थान*

माजी नगरसेवक सूर्यकांत खैरे यांनी नागरिकांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याचा ज्येष्ठ नागरिकांनी आरोप केला. प्रभागातील नागरिकांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. आम्ही प्रभागातील विकास कामासाठी कोऱ्या लेटरपॅडवर सह्या केल्या होत्या. या चुकीच्या कामाला आमच्या नागरिकांचा पाठिंबा नाही.

खैरे यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी व आर्थिक हितसंबंधासाठी नागरिकांच्या सह्याचा उपयोग केला आहे. नागरिकांची दिशाभूल केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ माजी नगरसेवक सूर्यकांत खैरे निषेध करीत आहेत. तसेच खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहिती तेथील एका ज्येष्ठ नागरिकाने दिली आहे.

मनपाची होतेय फसवणूक मनपाला एक रुपयाचाही महसूल नसलेल्या या जागांवर शाळा-भाजी मार्केट, व्यापारी संकुल व पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचेही सांगितले जात आहे.

त्यामुळे या मूळ प्रश्नाकडे महापालिका लक्ष देणार की अतिक्रमण काढण्याची मागणी करणारे निवेदन खरे की खोटे, याची शहानिशा करणार, असा सवालही यातून उपस्थित होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button