रेस्टॉरंट सुरू करा; खा.सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केल्यानंतर अनेक उद्योगधंदे बंद झाले. त्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. परंतु हॉटेल, रेस्टॉरंट मात्र बंद आहेत. 

आता केवळ पार्सल सुविधा सुरु आहे. परंतु  पार्सल सेवा सुरू करून रेस्टॉरंटचा व्यवसाय सावरणार नाही तर रेस्टॉरंट पूर्णपणे सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट व्यवसाय डबघाईला आला आहे. मागील सहा महिन्यांपासून रेस्टारंट बंद आहेत. सध्या पार्सल देण्याची परवानगी आहे. पण तरीही उदरनिर्वाहासाठी ही गोष्ट पुरेशी नाही.  रेस्टॉरंट बंद असल्याने चालक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

अनेक रेस्टॉरंट चालकांचा हाच मूळ व्यवसाय असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. परिणामी रेस्टाँरंट चालक मानसिक दबावाखाली आहेत  अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले होते. या निवेदनावर सुप्रिया सुळे यांनी व्टिट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल सेवेची मुभा आहे. पण या व्यवसायाला सावरण्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही. या व्यावसायिकांना होणारा आर्थिक त्रास लक्षात घेऊन रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.

त्यासाठी सोशल डिस्टंसिंगची मार्गदर्शक तत्वे जारी करावी असेही नमूद केले आहे. यापूर्वी त्यांनी जीम व चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment