ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ नदीच्या पाण्यात मृतदेह सापडला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे पुरुष जातीचे मृतदेह सापडला आहे. या बाबतची माहिती शहर पोलिस स्टेशनला मिळताच सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली.

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास डाऊच बुद्रूक येथील गोदावरी नदीच्या पाण्यात हा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याबाबत पोलिस पाटील अण्णासाहेब विश्‍वनाथ कांबळे यांनी शहर पोलिस स्टेशनला खबर दिली.

पोलिसांनी खबर मिळाल्यानंतर जागेची पाहणी केली. हे प्रेत वय ३० ते ३५ असण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सुरू आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment