जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोना सुसाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- घरी राहा सुरक्षित राहा… विनाकरण फिरू नका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसते आहे.

कोपरगावात आज (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे 101 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 33 जणांचे अहवाल बाधित तर 68 निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती बाधित आले आहे.

तालुक्यातील बधितांचा आकडा एक हजार पार गेला असून तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १००४ झाली आहे. दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे आज १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने

त्यानं घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १७८ बाधीत व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment