Ahmednagar News

जिल्ह्यात बिबट्यांचा वाढत्या सुळसुळाटाचा बंदोबस्त करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून, पकडलेले बिबटे ताडोबाच्या जंगलात सोडावे, तसेच वन विभागाने केलेल्या मागील कार्याच्या उपाय योजनांचा अहवाल सादर करण्याच्या मागणीचे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने उप वनअधिक्षक आदर्श रेड्डी यांना देण्यात आले.

यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, विद्यार्थिनी समन्वयक मनिषा गायकवाड, रोहिणी वाघमारे उपस्थित होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचा सुळसुळाट वाढत आहे. बिबट्याने अनेक लहान मुले, महिला व पुरुषांवर हल्ले केल्याचे घटना घडल्या आहेत.

तर अनेक पशु प्राण्यांना ते भक्ष्य बनवित आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्यापासून मनुष्याला इजा पोहचत आहे. पकडण्यात आलेली बिबटे वन विभागाकडून कोठे सोडली जातात हे सर्व सामान्य नागरिकांना कळण्यास मार्ग नाही. त्यांना लांब जंगलात सोडल्यास पुन्हा ते शहरी व ग्रामीण भागात अढळणार नाही.

ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवर लोक राहतात. त्यांना गावातुन आपल्या घरापर्यंत येताना भिती वाटते. महिला व लहान मुले संध्याकाळी घराबाहेर देखील पडत नाही. तर शेतकरी वर्ग दिवसा शेतात जायला घाबरत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहर व ग्रामीण भागात बिबट्यांचा सुळसुळाट वाढत असताना वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी विशेष पथक नेमावे,

पकडलेले बिबटे लांब ताडोबाच्या जंगलात सोडावे, या कामासाठी वन विभागाने मनुष्यबळ वाढवावे, बिबट्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने केलेल्या उपाययोजनांचा अहवाल व पकडलेल्या बिबट्यांचे पंचनामे सादर करावे तसेच बिबट्यांचा

प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारचे जाचक नियम अडथळे ठरत असल्याने त्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button