Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगरकरांसाठी मनपा कडून एक आनंदाची बातमी

0

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडेही म्हणावे असे उत्पन्न मिळत नाही. आर्थिक उत्पन्न घटल्यामुळे बहुतांश नागरिकांनीही अजून पालिकेची पट्टी भरलेली नाही.

यावर पर्याय म्हणून महापालिकेने मालमत्ता करात 8 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जुलैपर्यंत ही सूट असते. परंतु, यंदा कोरोनामुळे मुदतवाढ देण्यात आली असून सप्टेंबर अखेरपर्यंत यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

यामुळे मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष पालिकेचे असते. हे बिल जर एप्रिल, मे महिन्यात भरले तर दहा टक्के आणि जून, जुलै असे दोन महिने आठ टक्के सूट दरवर्षी मालमत्ताधारकांना देण्यात येते.

अर्थिक वर्षांमध्ये मालमत्ता कराच्या एकूण वसुलीपैकी जवळपास 30 टक्के रक्कम एप्रिल, मे, जून व जुलै अशा चार महिन्यांमध्ये महापालिकेत जमा होते.

परंतु यावर्षी कोरोनामुळे महापालिकेने करावरील सूट देण्यामध्ये मुदतवाढ दिली आहे. यंदा कोरोनामुळे बहुतांश कर्मचारी कोरोना कामामध्ये गुंतलेले आहेत.

अनेकांना अद्याप बिले मिळाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जुलैपर्यंत असणारी सूट सप्टेंबरअखेरपर्यंत करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

li