अहमदनगर जिल्ह्याचे ‘ऑनलाईन’ विभाजन , मुख्यालयात श्रीरामपूरने मारलीय बाजी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा खूप मोठा आहे. त्याचे प्रशासकीय दृष्टीने विभाजन व्हावे अशी मागणी अनेक दशकांपासून सुरु आहे. परंतु जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.

परंतु शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या जरी जिल्ह्याचे विभाजन झाले नसले तरी सध्या सोशल मीडियातून यावर काम सुरु झाले आहे. जिल्हा विभाजनाचा ऑनलाईन (https://vote.pollcode.com/39751421) मतदानाचा खेळ रंगला आहे. यात आतापर्यंत 34 हजारांहून अधिक व्यक्तींनी मतदान केले असून, श्रीरामपूर व संगमनेर या दोन शहरांमध्ये नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाबाबत चुरस सुरू आहे.

शुक्रवारी दुपारपर्यंत श्रीरामपूरसाठी 46 टक्के तर संगमनेरसाठी 41 टक्के ऑनलाईन मतदान झाले होते. या मतदानाचा शेवट कधी होणार व त्या मतदानाची दखल कोण घेणार, याचा प्रश्न असला तरी सध्याच्या स्थितीत हे ऑनलाइन मतदान श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी व कोपरगाव परिसरात चर्चेचा विषय झाले आहे.

* काय आहे हा प्रकार ? :- श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी अमेरिकेतून ही मोहीम सुरू केली आहे. भोसले यांनी अमेरिकेतून काहींना मतदानाची लिंक पाठविली. त्यानंतर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने या ऑनलाइन मतदानाची लिंक सगळीकडे व्हायरल केली असून, श्रीरामपूर नव्या जिल्ह्याची आशा बाळगणारांकडून त्यावर मतदान करवून घेतले जात आहे.

* हा आहे मतदानाचा निष्कर्ष :- वोट पोल लिंकवर हे ऑनलाइन मतदान सध्या सुरू आहे. नगर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवा जिल्हा व्हावा, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न विचारून संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव व शिर्डी असे चार पर्याय (ऑप्शन्स) दिले गेले आहेत.

शुक्रवारी दुपारपर्यंत 34 हजार 535 जणांनी यावर मतदान केले होते व त्यापैकी 14 हजार 118 म्हणजे 41 टक्के मते संगमनेरला, 15 हजार 912 म्हणजे 46 टक्के मते श्रीरामपूरला मिळाली होती.

या दोन्ही शहरांमध्येच नव्या मुख्यालयासाठीची रस्सीखेच दिसत होती. कोपरगाव शहराला 1 हजार 544 म्हणजे 5 टक्के तर शिर्डी शहराला 2 हजार 961 म्हणजे 9 टक्के व्यक्तींचा पाठिंबा दिसत होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment