इकडे लोक मारतायत.. मात्र यांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप हा विषय नेहमीच चर्चेचा बनतो. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे.

‘सरकारमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील लोकांचा केवळ पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्यावर कोरोनाचे एवढे मोठे संकट असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सगळा वेळ हा ग्रामपंचायतवर मागच्या दाराने प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेला,

’ अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. ‘ग्रामपंयायतवर प्रशासक नेमण्याचा डाव उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. या सरकारकडे धोरण नाही. तीन तिघाडी व काम बिघाडी असे या सरकारचे काम आहे,

’ असेही ते म्हणाले. कोरोनाच्या प्रश्नावरून विखे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांवर निशाणा साधला.‘आपल्या जिल्ह्यातील तीन सुपूत्र हे मंत्री आहेत. ते काय करतात, हे त्यांना जिल्ह्यातील लोकांनी विचारले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट पाहता जिल्ह्याच्या खासदारांनी लॉकडाऊनची मागणी केली

मात्र हे सरकार केवळ प्रशासनाच्या भरवशावर सुरू आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘करोनाच्या काळात सत्ताधारी पक्षातील मंडळी कुठेच दिसत नाही. ही मंडळी केवळ मोठमोठे कोविड हॉस्पिटल सुरू केल्याच्या घोषणा करतात. आज त्यांनी घोषणा केल्या, त्याठिकाणी जाऊन पाहिले तर तेथे ना बेडचा पत्ता, ना डॉक्टराचा पत्ता आहे.

‘केवळ सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक लोकांचे बळी गेले आहेत. याला पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री देखील जबाबदार आहेत. या सगळ्या प्रकाराची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. अन्यथा असंख्य पांडुरंग रायकरांचे जे दुर्देवी मृत्यू होत आहेत, याला सरकारची अनास्था कारणीभूत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment