Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingLifestyleMaharashtra

लोकप्रिय सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे आकस्मित निधन

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग मास्तर म्हणून सर्वपरिचित झालेले आणि नगरसह कोपरगाव राहुरी, पारनेर या तालुक्यात प्रदीर्घ सेवा बजावलेले सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले.

युवान संस्थेचे संस्थापक संदिप कुसळकर आणि जिल्हा पोलीस विशेष शाखेतील कर्मचारी प्रविण कुसळकर यांचे ते वडिल होते.मूळचे पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी गावचे रहिवासी असलेले कुसळकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी अहमदनगर पोलीस दलात प्रवेश मिळवला.

नगरसह कोपरगाव येथे उसळलेल्या अनेक धार्मिक दंगली हाताळण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांची चपळता पाहून नगरचे तत्कालीन पोलीस अधिक्षक हिमांशु रॉय यांनी त्यांची पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग मास्तर म्हणून नेमणूक केली. सलग १० वर्ष जिल्ह्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी कडक पोलीस प्रशिक्षण दिले.

एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे ठाणे अंमलदार म्हणून काम पाहतांना स्नेहालयसह माऊली आदी स्वयंसेवी संस्थांना विविध केस संवेदनशीलपणे हातळण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.नगर वाहतूक शाखेत कार्यरत असतांना सर्वाधिक महसूल मिळवून देण्याचे रेकॉर्ड त्यांनी केले.

त्यांच्या प्रदीर्घ ३७ वर्षाच्या सेवा कार्यकाळात त्यांना ३०० पेक्षा अधिक बक्षीसे मिळाली. सेवानिवृत्तीनंतर गावी परतत शेती आणि शेतीपुरक व्यवसायात त्यांनी अल्पावधित ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने अहमदनगर पोलीस दलासह कोळसांगवी पंचक्रोशीत शोकछाया पसरली.

जेष्ठ गांधीवादी समाजसेवक डॉ.एस.एन.सुब्बराव, जेष्ठ समाजसेवक डॉ.विकास बाबा आमटे, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य समन्वयक अँड.श्याम असावा, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आय.ए.एस. राहुल कर्डिले,

माऊली संस्थेचे डॉ.राजेंद्र धामणे, पाथर्डी -शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे, वकिल संघटनेचे अँड. संदिप वांढेकर, अँड.विनायक सांगळे, डॉक्टर संघटनेचे डॉ. श्याम तारडे, डॉ.एस.एस. दिपक, डॉ. दिलीप पवार, फोटोग्राफर संघटनेचे सुरेश मैड आदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button