‘राठोड कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शिवसेनेचे माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या कुटुंबियांची कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मंत्री भुसे म्हणाले, शिवसेना उपनेते स्वर्गीय राठोड हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते.

त्यांच्या संपूर्ण कुटुंबामागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांचे निधन झाले.

त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेची मोठी हानी झाली असल्याचे मत अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनानंतर अनेक शिवसेना नेत्यांनी या ठिकाणी भेट देत दुःख व्यक्त केले होते.

दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनीहे भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे आणि शिवसैनिकांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, विशाल वालकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment