या कारखान्यातील अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; कारखाना बंद!

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे जाळे दिवसेंदिवस विस्तृत होत आहे. तसेच रुग्णवाढीबरोबरच जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा देखील वाढतो आहे.
श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे उपचारादरम्यान, नगर येथे मृत्यु झाला.
यापुर्वी सदर कारखान्याच्या विविध विभागाच्या दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी म्हणुन पुढील काही दिवस कारखाना विभाग बंद ठेवण्याची मागणी सभासदांसह कामगारांतुन होत
आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संर्सग झपाट्याने वाढला आहे. तालुक्यात कोरोनामुळे मागील काही दिवसात 25 हुन अधिक रुग्णांचा बळी गेला. तर 800 हुन अधिक नागरीकांना कोरोनाची बाधा झाली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved