पाय घसरला आणि त्याचा शेवट झाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणाचा नदी पात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

याबात समजलेली माहिती अशी कि. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील राजेंद्र काशिनाथ भोसले हा सकाळी प्रवरा नदी पात्रा जवळ गेला असता त्याचा पाय घसरून तो नदीमध्ये पडला.

त्यानंतर त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहिम सुरू असताना त्याचा मृतदेह काही अंतरावरच बाभळीमध्ये

अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या मागे त्यांच्या पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे . या घटनेमुळे परीसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment