माझ्याच वाहनावर कारवाई का करता ? म्हणत तो तहसीलदार यांच्या दालनात आणि आत्मदहन….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- काल (शुक्रवार) नेवासे महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो (एमएच 04 एफडी 8278) या वाहनावर कारवाई केली होती.

यामुळे त्रासलेल्या सदर इसमाने थेट नेवासा तहसीलदार यांच्या दालनात धडक मारली आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नेवासा खुर्दचे मंडल अधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी फिर्याद दिली असून वाळू टेम्पो मालकावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय आसाराम हिवरे असे या टेम्पो मालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी: नेवासा खुर्दचे मंडल अधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे हे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास नेवासा तहसीलदार, तलाठी बी. एन. कमानदार सरकारी वाहनचालक संतोष पडोळ हे अवैध गौण खनिज वाळू उत्खनन करून

वाहतूक करीत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नेवासा ते चिंचबन रोडवर कारवाई करत असताना सदर टेम्पो वाळूची वाहतूक करताना मिळून आला. सदर टेम्पोचा पंचनामा केला तेव्हा त्यामध्ये सुमारे 2 ब्रास वाळू मिळून आली. सदर टेम्पोवर पुढील कारवाई कारण्यासाठी सदरचा टेम्पो तहसिल कार्यालयातील आवारात आणून लावला होता

व पुढील कारवाई करीत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या टेम्पोचा मालक दत्तात्रय आसाराम हिवरे हा तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या दालनामध्ये हातात एक पांढरे रंगाचा ड्रम घेवुन आला व तहसिलदार यांना म्हणाला की, तुम्ही इतर वाळु वाहतुक करणारे वाहनावर कारवाई का करत नाही,

माझ्याच टेम्पोवर कारवाई का करता? असे म्हणून त्याने त्याचे सोबत आणलेल्या हातातील पांढर्‍या रंगाचे ड्रम मधील रॉकेल त्याने त्याचे स्वत:चे अंगावर ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्या इसमास पकडत त्याच्या हातातील रॉकेलचा ड्रम व माचिस हिसकावून घेतली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment